“पवनामाई’चा श्‍वास गुदमरतोय!

पिंपरी – शहराची जीवनवाहिनी समजली जाणारी पवनामाई दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली आहे. महापालिकेच्या अहवालानुसार नाल्याचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने प्राणवायूचे प्रमाण लक्षणीय घटले आहे.

देहू ते सांगवी असे 24 किलोमीटरचे पवना नदीपात्र शहराला लाभले आहे. या पात्राच्या बाजूला रहिवासी व एमआयडीसी असे दोन्ही भाग आहेत ते दोन्ही नदीच्या प्रदुषणात भर घालत आहेत. महापालिकेच्या अहवालानुसार ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत रावेत बंधारा येथे डी. ओ. म्हणजेच पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्‍सिजनचे प्रमाण प्रतिलीटर 2 मिली ग्रॅम हे प्रमाण हे समाधानकारक होते. यामध्ये मोरया गोसावी येथे हे प्रमाण 7.9 मिली ग्रॅम एवढे आहे. तर किवळे येथे हे प्रमाण 6.7 मिली ग्रॅम एवढे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डि. ओ. चे हे प्रमाण समाधानकारक असले तरी जैविक घटकांच्या विघटनासाठी आवश्‍यक ऑक्‍सिजन म्हणजेच बी.ओ.डी. व अशुध्द पाण्यातील रासायनिक पदार्थांचे विघटन करण्यासाठी आवश्‍यक ऑक्‍सिजन म्हणजेच सी.ओ.डी. चे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. नदीपात्रात थेट सोडल्या जाणाऱ्या औद्योगिक परिसरातील रासायन मिश्रित पाण्याबरोबरच नाल्याचे पाणी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अहवालानुसार पावसाळा व उन्हाळा या काळात सर्वाधिक प्रदूषण वाढत आहे.

ही आहेत सर्वाधिक प्रदूषित ठिकाणे
पर्यावरण अहवालानुसार पवना नदीपात्रातील सर्वाधिक प्रदूषित ठिकाणे ही पिंपरीगाव नवीन पूल पात्र व दापोडी येथील हॅरीस पूल ही दोन ठिकाणे सगळ्यात प्रदूषित आहेत. या भागातील झोपडपट्टी व नाल्यातून येणारे पाणी यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरुप आले आहे. पवना नदीला शहरातून एकूण 28 नाले जाऊन मिळतात. यातील मामुर्डी नाला व कुकी नाला हे दोन नाले सर्वाधिक प्रदूषित नाले आहेत. मामुर्डी नाला हा देहुरोड बाजार व विकासनगर येथील दूषित पाणी वाहून आणते. कुकीनाला मोहननगर व चिंचवड एमआयडीसी येथून दूषित पाणी वाहून आणत आहे.

नद्यांमध्ये नाल्याद्वारे दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जाते. महापालिकेचे मैलाशुद्धीकरण प्रकल्प काहीही काम करत नाहीत. नाल्यातून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केली तर नदी प्रदुषणावर नक्कीच आळा बसेल. यासाठी महापालिकेने ग्रीन ब्रीज या उपक्रमाचीही माहिती दिली होती. मात्र महापालिका प्रशासन हे निष्क्रीय असून ते पुढाकार घेत नाहीत. आम्ही सामाजिक संस्था त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहोत.
– धनंजय शेठबाळे, सदस्य, पवना जलदिंडी अभियान.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)