पवनानगर येथे बारावी परीक्षा केंद्र सुरु करण्याची मागणी

येळसे, (वार्ताहर) – येथील पवना विद्या मंदिर शाळेत दहावीचे माध्यामिक शालांन्त परीक्षेचे केंद्र असून, या शाळेत व उच्च माध्यामिक शालांत परीक्षेचे केंद्र सुरू करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

पवनानगर ही या भागातील 40 गावे वाड्या-वस्त्याची मुख्य बाजारपेठ असून येथे उच्च माध्यमिक व महाविद्यालय असून, या कॉलेजमध्ये परिसरातील 200 ते 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच या परिसरातील कोथुर्णे, पवनानगर, शिवणे येथेही उच्च माध्यमिक विद्यालय आहे. बारावीचे वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे महत्वाचे वर्षे आहे. या ठिकाणी परीक्षा केंद्राची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना 30 ते 40 किलोमीटर अंतरावरील लोणावळा किंवा तळेगाव येथे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बरचसा वेळ हा प्रवासात जातो. त्यामुळे त्यांना अभ्यासाठी वेळ अपुरा पडते.

त्याचप्रमाणे पवनानगर अथवा ग्रामीण भागातून ये-जा करण्यासाठी वाहणांची पुरेसी व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेस वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे या भागातील पवनानगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच येथे दहावीचे परीक्षा केंद्र सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी बारावीचे परीक्षा केंद्र सुरू करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)