पवनानगर येथे अदिवासी समाजाचा मेळावा संपन्न

पवनानगर, (वार्ताहर) – येथील शिवप्रसाद मंगल कार्यालय येथे आदिवासी हक्‍क जनजागरण मोहीम अंतर्गत पवनानगर परिसरातील आदिवासी, कातकरी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी समाजातील त्यांच्या सद्यस्थितीतील प्रश्‍नावर खुली चर्चा करण्यात आली.

या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे म्हणाले की, परिसरातील शंभरपेक्षा अधिक आदिवासी बांधव निर्वासित आहे. त्यांना रहाण्यासाठी घरे नाहीत. रेशनिंग कार्ड उपलब्ध नाहीत, परंतु काही लोक त्यांचा राजकीय फायद्यासाठी त्यांचा फक्‍त वापर करतात. आधारकार्ड काढण्यासाठी अशिक्षित पणाचा गैरफायदा घेऊन दीड हजार रूपये उकळले. जातीचे दाखले मिळत नाहीत. परंतु यापुढील काळात भारिप बहुजन महासंघ कायम त्यांच्या पाठीशी ठामपमे उभा राहील.
या वेळी भारिप बहूजन महासंघ मावळचे तालूका अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, किशोर कांबळे, जयराम साळवे, एल. आर. कांबळे गुरूजी, संतोष लोखंडे, विजय भालेराव, बबनराव वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)