पवनाधरणाची सुरक्षा रामभरोसे

पवनानगर – मावळसह पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवनाधरण परिसरात एकही सुरक्षा रक्षक नसल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. धरणानजिक परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात मात्र धरण प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात नाही.

आज रविवार असल्याने पवनमावळात पर्यटकांची संख्या मोठी होती. त्यातील बहुतेक पर्यटक हे धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटत होते. परंतु याकडे अधिकारी अनभिज्ञ असून केवळ या प्रकाराबाबत बोलण्याचे टाळत आहेत.

-Ads-

गेल्या काही दिवसांपासून धरणाचे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रविवारी प्रशासनाकडून 3350 क्‍यूसेक पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले. पाणी सोडले असल्याने धरणजवळ पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या धरणाला सुरक्षा रक्षक असला तर महत्त्वाचे ठिकाणी निर्बंध घालता येईल. तरी लवकरात लवकर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिक नागरीक सचिन मोहिते, लहु कालेकर, शरद कालेकर, गौरव दाभाडे, विजय निंबळे, सोनू काळे, गणेश गावडे यांनी दै. प्रभातकडे केली आहे.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नानासाहेब मठकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, पवना धरणाचा परिसर मोठा असल्याने धरणासाठी सरक्षारक्षकाची गरज असून सुरक्षारक्षक मागणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. धरणासाठी तात्काळ सुरक्षारक्षक मिळेल. तोपर्यंत कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)