“पवनाथडी’तील “स्टॉल्स’साठी सोडत

पिंपरी – महापालिकेच्या वतीने 4 ते 8 जानेवारी या कालावधीत सांगवीमध्ये पवनाथडी जत्रा भरविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या 813 महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यासाठी आज (शनिवारी) सोडत काढण्यात आली.

महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा होत आहे. जत्रेतील स्टॉलसाठी एकूण 820 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 7 अर्ज कागदपत्रांअभावी अपात्र ठरले. उर्वरित 813 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामध्ये वस्तू विक्री स्टॉलसाठी 361, शाकाहारी खाद्यपदार्थ स्टॉलसाठी 247 व मांसाहारी खाद्यपदार्थ स्टॉलसाठी 205 असे एकूण 813 महिला बचतगटांकडून आलेले अर्ज पात्र ठरले. 10 बाय 10 आकाराचे 450 स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दोन बचत गटांमध्ये एका स्टॉल दिला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोडत कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या आरती चौंधे, स्वाती काटे, स्वीकृत सदस्य ऍड. मोरेश्‍वर शेडगे, सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे तसेच 42 महिला बचतगटांचे प्रतिनिधी सोडतीसाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)