पवनहंसच्या विक्रीसाठी लवकरच निविदा 

नवी दिल्ली: हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या पवनहंस कंपनीची 100 टक्के भाग विक्री करण्यासाठी सरकार निविदा मागविणार आहे. या कंपनीत सरकारचे 51 टक्‍के तर, ओएनजीसीचे 49 टक्‍के भाग आहेत. सरकारने 13 एप्रिल रोजी 51 टक्‍के भाग विक्रीसाठी जाहिरात दिली होती. तथापि, सरकारसोबत आम्हीही कंपनीतून बाहेर पडण्यास तयार असल्याचे ओएनजीसीने 2 जुलैला कळविले. त्यामुळे आता पवनहंस कंपनीच्या 100 टक्‍के भाग विक्रीसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. सरकारने पवनहंसमधील आपला हिस्सा विक्रीचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)