पवनमावळ महिला अध्यक्षपदी शैलाबाई कालेकर

पवनानगर – काले ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य शैलाबाई रामचंद्र कालेकर यांची अखिल भारतीय वारकरी सांप्रदायच्या पवनमावळ महिला अध्यक्षपदी जाहीर निवड करण्यात आली आहे.

कालेकर यांनी यापूर्वी काले ग्रामपंचायतीचे सदस्यपद व काळुबाई महिला बचत गटाचे अध्यक्ष पद भूषविले आहे. कालेकर म्हणाल्या की, मला वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी निभावेन. या वेळी अखिल वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष लक्ष्मण महाराज ठाकर, दत्तोबा महाराज भोते, सुनील वरघडे, अक्षय येवले, मच्छिंद्र कुंभार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)