पवईत भीषण आग, 70-80 जणांची सुखरुप सुटका

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. पवईच्या चांदिवली विभागात असलेल्या नेट मॅजिक कंपनीच्या तळमजल्याला आज अचानक भिषण आग लागली. मात्र, ईमारतीमधील 70-80 जणांची तातडीने सुटका करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

पवईच्या चांदिवली विभागात असलेल्या नेट मॅजिक कंपनीच्या बेसमेंटमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या वायर आणि इतर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. दरम्यान, तळमजल्यात आज आगीने अचानक पेट घेतला. त्यानंतर आग मोठ्या प्रमाणात भडकली. इमारतीमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीमधील 70 ते 80 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र ही आग नेमकी कशामुळे धुमसली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती नेट मॅजिककडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)