पवईत कंपनीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग

मुंबई :  मुंबईतील पवईच्या चांदिवली विभागात असलेल्या नेट मॅजिक कंपनीच्या तळमजल्याला भाषण आग लागली. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये बांधकामासाठी लागणारे वायर आणि इतर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली.

इमारतीमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीमधील 70 ते 80 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र ही आग नेमकी कशामुळे धुमसली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती नेट मॅजिककडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)