पळसेदव गावावर कॅमेऱ्याची नजर

गावात बसविली सिसिटीव्ही यंत्रणा

पळसदेव – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इंदापूर तालुक्‍यातील मोठ्या गावात गणना होणाऱ्या पळसदेव गावात सुरक्षिततेचा दृष्टीकोनातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती सरपंच अश्विनी काळे यांनी दिली. यावेळी माजी सरपंच नंदा बनसुडे, उपसरपंच तुळशीराम काळे, ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे, अंकुश जाधव, धनंजय बनसुडे, विठ्ठल वागजकर, सुरेश बनसुडे आदी उपस्थित होते.

सध्या, ग्रामपंचायत कार्यालय, जलशुद्धीकरण यंत्रणा व महामार्गाचे चित्रण करण्यासाठी सुमारे आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुढील काळात गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे सरपंच अश्विनी काळे यांनी सांगितले. पळसदेव गावात महामार्गावर अनेकदा आपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे, अशा घटनांची नेमकी माहिती मिळवण्यासाठी तसेच अनेक बाहेरील ऊसतोडणी कामगार तसेच सध्या परप्रांतीय मासेमारी करणारे अनेक नागरिक गावात आले आहेत. भविष्य काळात काही अनिष्ट प्रकार घडू नयेत, यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगी ठरणार असल्याचे ग्रामसेवक जालिंदर भांड यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)