पळसेदवला किर्तनातून संत सेना महाराची कथा

पळसदेव- संत सेनामहाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सेनामहाराज मंदिर येथे नाभिक समाजाच्यावतीने भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले, अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. जाता पंढरीसी सूख वाटे जीवा, असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लिन झाला. पंढरी ही त्यांच्या जीवनाचा ध्यास बनली. श्रावण वद्य द्वादशी ही त्यांची पुण्यतिथी मानली जाते, असे हभप संपत शिंदे यांनी किर्तनातून विषद केले.
या वेळी महाराष्ट्र कामगार केसरी हिराचंद काळे, शरद काळे, भूषण काळे, बाळासो काळे, हनुमंत बनसुडे, तुळशीराम काळे, अंकुश काळे, हभप संपत शिंदे, रामकृष्ण शिंदे, नारायण शिंदे, मारुती साळुंखे, दिपक गाडेकर यांच्यासह नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)