पळसावडे शेती सोसायटीवर कॉंग्रेसचे वर्चस्व

पळसावडे : सामुदायिक शेती सहकारी सोसायटीवर वर्चस्व मिळवल्यावर जल्लोष करताना कॉंग्रेसचे संचालक आणि कार्यकर्ते.

रासप आणि राष्ट्रवादी युतीचा धुव्वा

खटाव, दि. 11 (वार्ताहर) – माण तालुक्‍यातील पळसावडे सामुदायिक शेती सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसने विजय मिळवला. कॉंग्रेसने रासप आणि राष्ट्रवादीच्या युतीला धोबीपछाड देत सर्वच जागा मताधिक्‍याने ताब्यात घेतल्या. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना या निवडणूकीत धक्का बसला.
पळसावडे सामुदायिक शेती सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत कॉंग्रेसने रासप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढले. मंत्री जानकरांचे गाव असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. आ. गोरेंच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसने 12-0 असा विजय मिळवला.
धोंडीराम यादव, भोजा यादव, अर्जुन जानकर, बाळू काळे, मारुती खुपकर, लिलाबाई पिसाळ, रंजना सरतापे, खंडू चव्हाण, वसंत चव्हाण, साहेबराव धुलगडे, महादेव सकट, लक्ष्मण शेंडगे हे कॉंग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे आ. जयकुमार गोरे, तालुका अध्यक्ष एम. के. भोसले, सरपंच सयाजी मोरे, सागर काळे, जगन्नाथ जानकर, श्रीरंग शेंडगे, बाळू यादव, काका यादव, सर्जेराव होरकाटे, आण्णा होरकाटे, पांडुरंग पिसाळ, गोरख यादव, विठ्ठल यादव यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)