पळसगावच्या रेशनिंग दुकानदारावर कारवाईची मागणी

वडूज – पळसगाव, ता. खटाव येथील रेशनिंग दुकानदाराने धान्याचा गैरव्यवहार करून शिधा धारकाकडून जादा दराने पैसे उकळले असल्याचा आरोप करीत संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील माहिती अशी, या दुकानदाराने संपूर्ण कॅश मेमोमध्ये प्रत्यक्ष असणारा धान्याचा माल न देता पुन्हा कार्बनकॉपीवर मोठ्या प्रमाणात खाडाखोड करून धान्याचा अपहार करत दरांमध्ये फरक केला आहे.

संबंधित दुकानदार सरस्वती अंकुश फडतरे यांनी लोकांना नुकसान भरपाई द्यावी, याबाबत ग्रामस्थांनी शासकीय कार्यालयात पत्रव्यवहारही केला आहे. विशेष म्हणजे दुकानदाराची चौकशी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी करून अहवाल वरिष्ठ कार्यलयात सादर केला आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)