पळशीत जिल्हा बॅंकेतर्फे ज्येष्ठांचा सत्कार

पळशी ः जिल्हा बॅंक शाखेतर्फे जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करताना सतीश शिंदे यांनी मान्यवर. (छाया ः संदीप जठार)

गोंदवले, दि. 11 (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिक हे समाजातील एक अनुभवी घटक असून त्यांना सन्मान करणे खूप मोठे कार्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे पळशी शाखेचे शाखाधिकारी सतीश शिंदे यांनी केले. पळशी, ता. माण येतील जिल्हा बॅंकेमध्ये जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पळशी गावातील ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करून त्यांना बॅंकेतर्फे गौरवण्यात आले. यात शालश्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करतेवेळी शाखाप्रमुख एस. बी. शिंदे, कॅशिअर एन. एम काळे, ए. एम. मुलाणी, समन्वयक एस. ए. पवार, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)