पल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी

काळगाव – रामिष्ट्येवाडीकडून तळमावलेकडे येत असताना समोरून आलेल्या पल्सरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल जखमी झाल्याची घटना दुपारी गुढे (ता. पाटण) येथील फाट्यावर घडली. वैभव यादव, असे जखमी कॉन्स्टेबलचे नाव असून त्यांच्यावर कराडातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

माथाडी नेते अविनाश रामिष्ट्ये हे मुंबईहून रामिष्ट्येवाडीला येणार होते. त्यांचा गार्ड म्हणून कॉन्स्टेबल वैभव यादव यांना पाठविण्यात आले होते. त्यानुसार यादव हे रामिष्ट्येवाडीला गेले. मात्र, रामिष्ट्ये उद्या गावी येणार असल्याचे सांगण्यात आल्याने ते परत तळमावलेकडे येत होते. गुढे फाट्यावर आल्यानंतर पल्सर गाडीने यादव यांच्या गाडीला धडक दिली. त्यात यादव यांचा डावा पाय फ्रॅक्‍चर झाला. उपचारासाठी त्यांना कराडातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)