पलूस-कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम बिनविरोध विजयी

सांगली : विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले. भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यांसह इतर आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने कदम बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्याचे माजी मंत्री आणि आमदार पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली.

काँग्रेसने पतंगराव यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. पुढील विधानसभा निवडणुकांना जेमतेम एका वर्षाचा कालावधी असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कदम यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)