पर्स मधून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी – निगडी येथे चालत्या पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करताना महिलेच्या पर्समधून सव्वा लाख रुपये चोरीला गेले आहेत. ही घटना 27 डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 30 डिसेंबर रोजी प्रमिला प्रमोद धर्माधिकारी (रा. टिळक चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमिला या टिळक चौक येथून पीएमपीएमएल बसमधून प्रवासासाठी बसल्या. त्या पुढे खंडोबा माळ, आकुर्डी येथे उतरल्या असता त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पर्समधून 1 लाख 16 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी निगडी पोलीस पुढील तपास करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)