पर्रिकरांना पुन्हा अमेरिकेत उपचाराला जावे लागणार

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा उपचारासाठी अमेरिकेला जावे लागणार असून ते मुंबईहून अमेरिकेला रवाना होणार आहेत. या वर्षी पर्रिकर यांच्यावर अमेरिकेत तीन महिने उपचार सुरू होते. यकृताच्या विकाराने ते त्रस्त आहेत. गेल्या जून महिन्यातच ते अमेरिकेहून उपचार घेऊन परत आले होते.

23 ऑगस्ट पासून त्यांच्यावर मुंबईतल्या लिलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. तेथून आज ते गोव्यात परत जाणार होते पण आता ते तेथूनच अमेरिकेला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती विषयी त्यांच्या आधिकाऱ्यांनी आणखी तपशील सांगण्यास नकार दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेतील उपचाराच्या काळातही मुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्याकडेच राहणार असल्याने त्यांनी तो तात्पुरत्या स्वरूपात कोणाकडेही हस्तांतरीत केलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)