पर्रिकरांची ऑडिओ टेप खरी आहे ; राफेल प्रकरणात राहुल गांधी यांचा पुन्हा दावा

नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकहे राफेल प्रकरणातील महत्वाच्या फायली आहेत त्यामुळेच भाजपचे नेते त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची शक्‍यता नाही अशी माहिती पर्रिकर यांच्याच एका वक्तव्याच्या अनुषंगाने गोव्यातील एक कॅबिनेट मंत्री विश्‍वजीत राणे यांनी आपल्या एका मित्राला फोनवरून दिली होती. त्या फोन कॉलची ऑडिओ टेप खरी असून राफेल प्रकरणातील सत्त्य पर्रिकर यांच्या बेडरुम मधील फायलींमध्ये दडले आहे त्याची चौकशी होण्याची गरज आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केले आहे.

राहुल गांधी यांनी या संबंधात आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की हे ऑडिओ टेपचे प्रकरण बाहेर येऊन आज महिना झाला तरी अजून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्याची चौकशीही झाली नाही. याचाच अर्थ ही ऑडिओ टेप खरी आहे. पर्रिकर यांच्याकडे राफेल प्रकरणातील स्फोटक माहिती आहे त्यामुळेच त्यांना पंतप्रधानांवर वरचढ होण्याचा अधिकार मिळाला आहे असेही राहुल यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एका कॅबिनेट बैठकीतच आपल्याकडे राफेल प्रकरणातील तथ्य सांगणाऱ्या फायली असून त्या आपल्या बेडरूम मध्येच असल्याचे त्यांनी म्हटले होते असा दावा गोव्याचे कॅबिनेट मंत्री विश्‍वजीत राणे यांनी आपल्या मित्राशी फोनवरून बोलताना केला होता. ती ऑडीओ टेप राहुल गांधी यांनी संसदेतही सादर केली होती पण ती टेप त्यांना सभागृहात वाजवण्यास सभापतींनी त्यांना अनुमती नाकारली होती. तेव्हापासून हे वादंग सुरू आहे. पण गेल्या काही काळात हा विषय मागे पडल्यासारखा झाला होता त्याला पुन्हा राहुल गांधी यांनी या निमीत्ताने हवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)