पर्रिकरांकडील बहुतेक महत्वाची खाती कमी करणार 

दिवाळीनंतर ते पुन्हा रूजू होण्याची शक्‍यता 
पणजी: प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडील बहुतेक महत्वाची खाती काढून घेतली जातील आणि त्या खात्यांचा सुरळीत कारभार सुरू ठेवण्यासाठी ती खाती मंत्रिमंडळातील त्यांच्या अन्य सहकाऱ्यांकडे सोपवली जातील अशी माहिती भाजपच्या काही नेत्यांनी दिली. पर्रिकर हे दिवाळी नंतर आपले नियमीत कामकाज सुरू करतील त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात बदल करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
भाजप आणि मित्र पक्षाच्या काही नेत्यांनी आज रूग्णालयात पर्रिकर यांची भेट घेऊन राज्यातील स्थिती विषयी चर्चा केली. गोवा भाजपचे नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत गोव्यातील प्रशासकीय स्थितीचाही यावेळी आढावा घेतला. या बैठकीत नेतृत्व बदलाविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. पर्रिकरांची प्रकृती सुधारत असून ते बहुधा दिवाळीनंतर आपला कार्यभार पुन्हा सुरू करतील अशी माहितीही नाईक यांनी दिली. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉर्वर्ड पाटीचे नेते विजय सरदेसाई यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही महत्वाच्या खात्याचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्यानंतर ही खाती अन्य मंत्र्यांकडे दिली जातील. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर आणि अपक्ष आमदार रोहन खाऊंते तसेच गोविंद गावडे यांनीही आज पर्रिकरांची भेट घेतली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)