पर्यावरण संवर्धनासाठी इंद्रायणी परिसरात पाचशे झाडांची लागवड

इंद्रायणीनगर : परिसरात विविध प्रकाराची पाचशे झाडांची लागवड करण्यात आली.

भोसरी – जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरण समतोल राखण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने धर्मगुरू डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या संदेशानुसार विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. अब्देअली भाईसाहेब, मुफद्दल भाईसाहेब आणि मुन्ना अकिलभाई यांच्या मार्गदर्शनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.

पिंपरी-चिंचवड येथील इंद्रायणीनगर परिसरात कडुलिंब, पिंपळ, वड, कांचन, करंज अशी विविध प्रकाराची 500 झाडे लावण्यात आली. नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, दत्तात्रय दिवटे, मधुकर गुजकर, माणिकराव जैद, मोहन सोनार उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते असगर आझाद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)