पर्यावरण संवर्धनासाठी आणखी तीस विद्यार्थी तयार

वाकड – पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी हजारो विद्यार्थ्यांवर पर्यावरण संस्कार करणाऱ्या पर्यावरण संवर्धन समितीसोबत आणखी तीस विद्यार्थी तयार झाले आहेत. इसीए तर्फे गुरुकुल शिक्षण संस्थेच्या पुनावळे शाळेत विद्यार्थी पर्यावरण समिती स्थापन करण्यात आली आहे.

एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसीए ) तर्फे पिंपरी चिंचवड शहरा मधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था सोबत पर्यावरणाचे अनेक उपक्रम राबवून संवर्धन व्हावे म्हणून प्रत्येक शाळेत इसीएची विदयार्थी पर्यावरण समिती स्थापन करण्यात सातत्याने कार्यरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शनिवारी (दि.30) गुरुकुल शिक्षण संस्थेच्या श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुनावळे शाळेत इसीएची विदयार्थी पर्यावरण समिती स्थापन करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे सचिव विश्वास ओव्हाळ , मुख्याध्यापक गणेश गवळी, इसीए स्वयंसेवक गोविंद चितोडकर, मीनाक्षी मेरुकर, सिकंदर घोडके, सुभाष चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, विकास भिंताडे, योगेश धावरे आदी शिक्षक उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पर्यावरणाच्या संस्कारांची आवश्‍यकता असते. तसे संस्कार विद्यार्थी पर्यावरण समिती स्थापन करून विविध उपक्रमातून घडविण्याचे प्रयत्न इसीएच्या माध्यमातून केले जातात. प्रत्येक शाळेतून 30 विद्यार्थी निवडून त्यात 18 मुलीचा समावेश असतो. इसिए तर्फे विद्यार्थ्यांना टोप्या, पर्यावरण अभ्यास पुस्तिका, पर्यावरण कार्टून फिल्म सीडी, 32 आठवडे अभ्यासक्रम पुस्तिका याचे मोफत वाटप करण्यात आले. संपूर्ण वर्षभर शाळेत विविध उपक्रम राबवून इसीए त्यांच्या अंतर्गत शालेय स्पर्धा आयोजित करून पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती निशुल्क तत्वावर करीत असते.

मार्गदर्शन पर भाषणातून चितोडकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संवर्धनाची आवश्‍यकता व प्रदूषण नियंत्रणात सर्वांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. कडुलिंब, बकुळ, अशोक अशा प्रकारची झाडे शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी महापालिका उद्यान विभागाची मदत व मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.
पुनावळे ः गुरुकुल शिक्षण संस्थेच्या श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी पर्यावरण समितीसोबत इसीए व शाळेचे पदाधिकारी आणि शिक्षक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)