पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास यांची सांगड आवश्‍यक – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली – पर्यावरण रक्षण आणि आर्थिक विकास यांची सांगड आवश्‍यक असल्याचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज देहरादून इथे सांगितले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे सांगतानाच वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण यांना जनचळवळीचे स्वरुप यायला हवे असे उपराष्ट्रपती म्हणाले.

वनांचे जतन हा वन व्यवस्थापनाचा गाभा असायला हवा. पर्यावरण स्नेही दृष्टीकोन आपण अंगीकारला पाहिजे आणि आपल्या उज्वल भवितव्यासाठी आपण निसर्गासमवेत राहिले पाहिजे. वृक्षारोपण आणि झाडांचे रक्षण हे आपले कर्तव्य आहे, असे प्रत्येक नागरिकाने मानले पाहिजे. वनांचे जतन करण्यासंर्भात आदिवासी आणि स्थानिक जमातींना मार्गदर्शन आणि माहिती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)