पर्यावरण रक्षणासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा : गडकरी

नवी दिल्ली :  देशात अनेक घरांमध्ये प्रत्येक सदस्याकडे चारचाकी आहे. मात्र, देशाच्या वाहतूक आणि पर्यावरणासाठी कुटुंबातील प्रत्येकाने वेगवेगळी गाडी वापरणे योग्य नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन केंद्रीय वाहतूक आणि रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सोमवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते.

प्रत्येक व्यक्तीचे जीवन अमूल्य आहे. रस्त्यावर अनेक दुर्घटनांमुळे अनेक परिवार उद्धस्त होतात. आपण रस्त्यावर स्वत:ची आणि रस्त्यावर चालणाऱ्या इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही गडकरी यांनी केले. पुढील एक आठवडा देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याचे तसेच नवीन रस्त्यांचा निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)