पर्यावरण मंत्री कदम यांनीच दिले प्लास्टिक वापरणारांवर कारवाईचे आदेश

शिर्डी – राज्यभर प्लास्टिक बंदीची मोहीम सुरू आहे. मात्र बुधवारी (दि.9) रात्री साई दर्शनासाठी आलेले पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना मंदिर परिसरात भाविकांच्या हातात प्लास्टिक पिशव्या दिसल्या. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना प्लास्टिक पिशवी जप्तीची कारवाही करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी रात्री शेजारतीपूर्वी साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने शाल व उदी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात काही भाविकांच्या हातातील प्लास्टिक पिशव्या जप्त करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. ना. कदम यांनी साईसमाधीचे दर्शन घेतल्यानंतर ते गेट क्रमांक 2 मधून बाहेर निघत असतांना जुना पिंपळवाडी रस्त्यावरील प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर त्यांचे अचानकपणे लक्ष गेले असता, त्यांनी स्वतः प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या भक्तांना थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आदेश देत दंडात्मक कारवाईच्या पावत्या मला पाठवा, अशी सूचनाही त्यांनी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपंचायतीच्या वतीने तत्काळ मंत्री महोदयांच्या आदेशाचे पालन करून मंदिर परिसरातील प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याचे नगरपंचायतीचे वरिष्ठ लिपिक देसले यांनी सांगितले. दरम्यान पर्यावरण मंत्री ना. कदम यांची साईबाबांवर श्रद्धा असून, महिन्यातून एक-दोन वेळेस त्यांचा शिर्डी दौरा असतो. ना. कदम यांनी शिर्डीत यापूर्वीही अशाच प्रकारे मंदिर परिसरात प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश देऊनही शिर्डी सारख्या अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्लास्टिक बंदी पूर्णता होत नसल्याने अनेकांनी खेद व्यक्त केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)