पर्यावरणासाठी दहीहंडी समितीचा अनोखा उपक्रम

देहुरोड – देहुरोड येथील सागर लांगे दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दहीहंडी उत्सव दिनी प्रत्येक प्रेक्षकांना रोपाचे वाटप करण्यात येणार आहे. झाडांची जोपासना करणाऱ्या प्रेक्षकांचा सन्मान व पाचशे रूपये रोकड देण्यात येणार आहे.

वाढत्या प्रदूषणाने उद्‌भवणारे विविध आजार टाळण्यासाठी समितीच्या वतीने यंदा नवा अनोखा उपक्रम राबविण्याची संकल्पना आहे. स्वच्छ, सुंदर, निरोगी शहर राखण्यासाठी दहीहंडी उत्सव दिनी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना फळवृक्षांची रोपे वाटप करण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी ही फळवृक्षाची रोपे आपल्या घरांसमोर, मोकळ्या जागेवर, शेताच्या बांधावर लावल्यानंतर रोपांसोबत सेल्फी फोटो काढवयाचा आहे.

वर्षभराच्या जोपासनानंतर वाढलेल्या रोपट्याचे पुन्हा सेल्फी फोटो (झाडासोबत फोटो, ट्री सेंल्फी) घेतल्यानंतर दहीहंडी उत्सव दिनी समितीकडे जमा केल्यावर वृक्षाची जोपासना करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांला पाचशे रूपयांची रोकड व सन्मान करण्यात आहे. या उपक्रास प्रत्येकाने साथ देण्याचे, प्रत्येक समिती, मंडळाने असा उपक्रम राबवित आपले परिसर, शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी राबविण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष हैदर शेख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)