पर्यावरणाच्या रक्षणासाठी हौदात विसर्जन करा !

पिंपरी – पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. मांगल्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या भक्‍ती-भावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्या प्रदुषित होऊ नयेत, यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्था, संघटना पुढाकार घेत आहेत. यामुळे, गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आल्याने गणपती मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी केले.

शहरातील आसवाणी असोशिएटस्‌ आणि स्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी चार हौद करण्यासाठी उभारण्यात आले असून त्याचे उद्‌घाटन सोमवारी (दि.17) महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आयुक्‍त हर्डीकर यांनी स्वहस्ते गणेश मृर्तीचे हौदात विसर्जन केले.

-Ads-

विजय आसवाणी, अण्णा बनसोडे, सारंग कामतेकर, नगसेवक शीतल शिंदे, डब्बू आसवाणी, नगरसेविका सीमा सावळे, राजू आसवाणी, श्रीचंद आसवाणी, विजय आसवाणी, सुरेश जुम्माणी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका माधुरी मुलचंदाणी, सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकाणी, जयहिंद हायस्कूलचे विद्यार्थी व स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.

आसवाणी म्हणाले, वैभवनगर येथे उभारण्यात आलेले हौद आठ फुट, नऊ फुट, बारा फुट आणि सोळा फुट खोलीचे आहेत. याठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे घरोघरी जाऊन, सोसायट्यांमधील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आवाहन व प्रबोधन केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)