पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठकीचा फज्जा

सत्ताधारी नगरसेवकांसह गणेश मंडळे, मूर्तीकारांनी फिरवली पाठ

सातारा, दि. 12 प्रतिनिधी
सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी छ. शिवाजी सभागृहात सातारा पालिकेच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला हाताच्या बोटावर मोजन्या इतकेच सत्ताधारी नगरसेवकाची आणि गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकारांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे या बैठकीचा फज्जा उडाल्याची खमंग चर्चा होती. नगरसेवकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची किती आस्था आहे, हे बैठकीवरून स्पष्ट होत आहे.
शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा पालिकेने ठराव करुन चांगला निर्णय घेतला परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाहीम्हणून सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी चार दिवसापूर्वी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांना निवेदन दिले होते. बैठक न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन पालिकेने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला हाताच्या बोटावर मोजता येतील इतपत नगरसेवक आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्याची उपस्थिती ही चर्चेचा विषय होता. या बैठकीत सुशांत मोरे यांनी सुचविलेल्या मुद्यांवर सखोल चर्चा झालीच नाही. सभागृहात केवळ थातूरमातूर चर्चा झाली.
पावसाळ्यात माकडाला घराची आठवण होते, तशी पालिकेला गणेशोत्सव जवळ आला की, विसर्जन तळ्याची आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याची आठवण होते. परंतु ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. बैठकांचा सिलसिला सुरु होतो मात्र त्यात एकमत होऊन निर्णयाची अंमलबजावणी काय होत नाही.आजच्या बैठकीत अशीच चर्चा झाली. यावर्षीगणेशमूर्तींची उंची, गणेश विसर्जन, गणेश विसर्जन मार्ग, पर्यावरणपूरक उत्सव, सामाजिक शांतता याबाबत नगरपालिकेने तातडीने पाऊले उचलणे आवश्‍यक आहे, मूर्तींची उंचीबाबात कुंभार समाजाची तातडीने बैठक घेणे आवश्‍यक आहे. यावर काहीच सकारात्मक विचार माडलेच गेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षानी बोलावलेली पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठक फार्स होती अशी टीका विरोधी नगरसेवकानी पत्रकारांशी बोलताना केली. या बैठकीला उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेविका स्मिता घोडके, नगरसेवक राजू भोसले, मनोज शेंडे, भाजपचे गट नेते मिलिंद काकडे, सिद्धी पवार, धनंजय जांभळे, विजय काटवटे सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. सारंगकर, शहर वाहतूक स. पो. नि. घाडगे, पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे याच्यासह, वीज मंडळ, प्रदूषण मंडळ अधिकारी उपस्थिती होती.

सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी छ. शिवाजी सभागृहात सत्ताधारी, विरोधी नगरसेवक, आणि शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. 12 रोजी आयोजित केली होती. दरम्यान बैठकीपूर्वी नगराध्यक्षानी कोणत्याही पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविकाची बैठक घेऊन चर्चा केली नव्हती. त्यामुळे या बैठकीला सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ फिरवली असे दबक्‍या आवाजात बोलले जात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)