पर्याय स्टार्टअपचा…

सुनिल चोरे 

डिजीटलायझेशनमुळे जग वेगाने बदलते आहे. त्यामुळे एखादी कल्पना आपले स्वप्न साकार करेलच, पण दुसऱ्यांचे भविष्यही बदलू शकते. कारण अगदी लहान स्टार्टअप असले तरी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. देशात सध्या नवनवे स्टार्टअप सुरू होत आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे चांगली कल्पना आहे त्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात. डिजीटलायझेशनच्या या जमान्यात जग वेगाने बदलत आहे. इंटरनेटच्या क्रांतीमुळे सर्वच गोष्टी ऑनलाईन मंचावरून कार्यान्वित होतात, वस्तू मिळतात. त्यामुळे एखादी चांगली कल्पना आपले आयुष्य बदलतेच पण दुसऱ्यांचे भविष्याला नवा आकार देऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारण लहान स्वरूपातील स्टार्टअपमध्ये नवे रोजगार तयार होऊ शकतात आणि लोकांच्या आयुष्याच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकते. ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळ स्नॅपडील, फ्लिपकार्ट तसेच पेटीएम, ओयो रुम्ससारख्या स्टार्टअपच्या यशाचे रहस्याचा उगम नव्या कल्पनेतच आहे. विशेष गोष्ट म्हणजे हे सर्व तरुण उद्योजक आहेत. त्यामुळे आपल्यापैकी कोणाकडेही पारंपरिक मार्गापेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता असेल तर ही कल्पना स्टार्टअपच्या रूपात साकार होऊ शकते.

स्टार्टअप काय आहे? – स्टार्टअप ही एक नवी कंपनी आहे. त्यामध्ये युवक स्वतः किंवा दोन तीन लोक मिळून आर्थिक गुंतवणूक करतात तसेच कंपनीचे संचालनही करतात. या कंपन्या अशी उत्पादने बाजारात आणतात जी बाजारात उपलब्ध नसतात किंवा ते मिळणे खूप कठीण आहे. नव्या कल्पनेच्या सहाय्याने अशी एखादी वस्तू सहजपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवणारा मंच निर्माण करू शकतात. मग त्यातूनच प्रसिद्धी आणि पैसा मिळू शकतो. स्वयंरोजगारातून स्वतःची उपजीविका चालवणाऱ्यांसाठी त्यांचा व्यवसाय, संघटना किंवा संस्था चालवण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःच खूप प्रयत्नशील राहावे लागते. कोणताही व्यवसाय स्थापन करताना व्यावसायिक विचार खूप महत्त्वाचा असतो. एक स्टार्टअप केवळ नवीन नवीन विचार, कल्पना अंमलात आणून व्यवसाय समृद्ध करत नाही तर अनेकांना रोजगार मिळवून देतो.

भारतात स्टार्टअपचे महत्त्व– स्टार्टअप भारतासाठी नवी कल्पना नाही. मात्र, स्टार्टअपसाठी असलेल्या नव्या धोरणांमुळे यामध्ये नवीन प्राण फुंकले गेले आहेत. नॅसकॉमच्या अहवालानुसार देशात 4200 स्टार्टअप आहेत. भारत आता स्टार्टअप बाबतीत फक्त अमेरिका आणि ब्रिटन यांच्या पिछाडीवर आहे. 2020 सालापर्यंत देशात 11 हजार हून अधिक स्टार्टअप तयार होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. भारतात स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांचे वय सर्वसाधारण 28 वर्षे आहे. रोज तीन – चार स्टार्टअप नव्याने सुरू होत आहेत. व्यापाऱ्याच्या धोरणात सकारात्मक बदल केल्याने जगभरातील गुंतवणूकदारांना देशात आकर्षित करण्यात सरकार यशस्वी झाले आहेच शिवाय स्टार्टअपमध्ये युवकांनी पुढाकार घेणे ही सकारात्मक गोष्ट आहे.

सरकारी मदत– भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांनी एखादे काम करायेच ठरवल्यानंतर ते काम पूर्ण करण्याची जिद्द ते अंगी बाळगतात. मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सरकारचे हे तीनही प्रकल्प देशातील उद्योग जगतासाठी एक क्रांती आहे ज्यामुळे भारताची उद्योगप्रतिमा जागतिक मंचावर उठून दिसते आहे. स्टार्टअपच्या सुरुवातीच्या तीन वर्षांचा फायदा करमुक्त आहे शिवाय त्याचे इन्स्पेक्‍शनही केले जात नाही.

स्टार्टअपचा विभाग- कंपनीचे स्टार्टअपच्या विभागात निवड होण्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. कंपनी पाच वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी. तसेच कंपनीचा टर्न ओव्हर 25 कोटी रुपयांहून कमी नसावा. तसेच कंपनीचे खासगी मर्यादित किंवा भागीदारी कंपनीच्या रूपात रजिस्ट्रेशन होणे आवश्‍यक आहे. कंपनी नोंदणीकृत नसेल तर कायदेशीर बाबीत अडकू शकते.

कसे मिळेल कर्ज? व्यवसायवृद्धी करण्यासाठी निधीची गरज भासल्यास बॅंकेकडून कर्ज घ्यावे लागते. त्यासाठी आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन असणे आवश्‍यक आहे. तसेच कंपनीला मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईजेज च्या निकषांची पूर्तता करावी लागते.

पहिले पाऊल– स्टार्टअपसाठी नव्या विचारांची आवश्‍यकता आहे. मात्र, ती कल्पना लोकांसाठी किती फायदेशीर आहे याचेही आकलन होणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच सुरुवात करण्यापूर्वी योग्य संशोधन, निरीक्षण करणे गरजेचे आहे. एक लक्ष्य ठेवून मगच कंपनी उघडण्याचा विचार करावा. त्यासाठी माहितगार व्यक्तींशी सल्लामसलत करावी. आपल्या कल्पनेवर भरपूर मेहनत करावी जेणेकरून यशाची चव चाखता येईल.
(लेखक “इंडिया सॉफ्ट’ या कंपनीचे राष्ट्रीय व्यवस्थापक आहेत.) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)