पर्यायी मार्गाचा वापर पार्किंगसाठी

गर्दीतून मार्ग काढताना रूग्णवाहिका

वाठार स्टेशन येथील परिस्थिती, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
वाठार स्टेशन, दि. 8 (वार्ताहर) – वाठार स्टेशन हे बाजारपेठेचे प्रमुख केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी भाडळे, चिलेवाडी, हासेवाडी, विखळे, जाधववाड़ी, फडतरवाडी, देऊर, हणमंतवाडी, आदर्की, नलवडेवाडी, बिचुकले, तळीये, तडवळे या परिसरातून लोक खरेदीसाठी येत असतात. वाठार स्टेशनचा आठवडी बाजार शुक्रवारी असतो. बाजारला पंचक्रोशीतील लोक येत असतात. त्यामुळे खूप गर्दी असते. बहुसंख्य लोक बाजारला येताना मोटरसायकल, सायकल किंवा चारचाकी गाड्या घेऊन येत असतात. नुकतेच रेल्वे प्रशासनाने गेट नंबर 45 बंद करण्यासाठी वाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला होता. परंतु, स्थानिक प्रशासनाने व ग्रामस्थांनी त्यास विरोध केला व गेट नंबर 45 जैसे थेच वाहतुकीस खुले ठेवले. तसेच रेल्वे प्रशासनाने काढलेला पर्यायी सिमेंट रोडचा वापर आठवडी बाजारात येणारे विक्रते व विविध प्रकारचे स्टॉलधारक यांनी रोडच्या दुतर्फा आपली दुकाने थाटली आहेत. तसेच दुचाकी, सायकल, चार चाकी गाड्यांनी पार्किंग म्हणून रेल्वेच्या सिमेंट रोडचा वापर चालू केला. जेव्हा रेल्वे येते त्यानंतर गेट नंबर 45 बंद झाले की, येणारी जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने होत असते. अशावेळी वाहनांना गर्दीतून मार्ग काढताना कसरत करावी लागते. कारण रोडच्या दोन्ही बाजूस बाजारातील विक्रेते व विविध स्टॉल, दुचाकी व चारचाकी गाड्या उभ्या असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असते. जर दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास याला नक्की कोणते प्रशासन जबाबदार राहणार. पोलीस प्रशासन? रेल्वे प्रशासन? का स्थानिक प्रशासन? तरी वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दुचाकी गाड्या व बाजारातील विक्रेते यांच्यावर नक्की कोण कारवाई करणार? असा प्रश्न प्रवाशांना, बाजारकरुंना, वाहतूकदारांना व ग्रामस्थांना पडला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)