पर्यायी जमीन मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्ताचा आत्मदहनाचा इशारा

वडूज, दि. 6 (प्रतिनिधी) – पर्यायी जमीन देण्याबाबतचा प्रस्ताव खास बाब म्हणून शासनास सादर करुनही याबाबत कोणतीही कार्यवीही झाली नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी विजय माळी यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात विजय माळी यांनी म्हटले आहे की, त्यांची वडूज येथील जमीन क्षेत्र उरमोडी प्रकल्पांतर्गत कालव्यासाठी केलले आहे. त्यांना पर्यायी जमीन देण्याबाबतचे खास बाब प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले होते. त्यानुसार पुनर्वसन अधिनियम व धोरणानुसार पर्यायी जमीन मिळण्यास ते पात्र असल्याचे निर्देश महसूल व वनविभाग यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवले आहेत.
त्याला जवळपास दोन वर्षे होवूनही लेखी अथवा तोंडी निर्देश कळविणेत आलेले नाहीत. तसेच या प्रस्तावावर पुढील कोणतीही कारवाई झालेली नाही. भुमीहीन असल्याने आपणास उपजिविकेचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे परिस्थिती हलाखीची झाली असून प्रस्तावावर कार्यवाही न झाल्यास स्वातंत्रदिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)