पर्यटन व्यवसायातून होतेय रोजगारवृद्धी (भाग दोन)

आपल्या राज्यात पर्यटनासाठी अनेक स्थळे आहेत. देशविदेशातील पर्यटक येथे गर्दी करत असतात. साहजिकच, त्यामुळे आजमितीला इतर कोणत्याही सेवाक्षेत्रापेक्षा पर्यटन उद्योग हा रोजगार निर्मितीत महत्त्वाचा मानला जातो. आता आपल्याकडे पर्यटन धोरणही जाहीर झाले आहे. या धोरणातून पर्यटन विकासाला अधिक गती प्राप्त झाली आहे. त्यामुळेच र्यटकांची संख्याही वाढत गेली आणि लोकांना रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.

आता आपल्याकडे पर्यटन धोरणही जाहीर झाले आहे. या धोरणातून पर्यटन विकासाला अधिक गती प्राप्त झाली. या धोरणातूनच अनेक ठिकाणी सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळेच तेथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत गेली आणि लोकांना रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला. यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले. अनेकांची कुटुंबे यातून उभी राहिली. हाताला काम नाही म्हणून रिकामे बसण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही.

चार वर्षांपुर्वी 2006 मध्ये जाहीर केलेले पर्यटनधोरण सर्वसमावेशक असून त्यातून पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चांगलाच फायदा झाला आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे पर्यटक कंपन्यांमध्ये काम करण्याची चांगलीच संधी उपलब्ध आहे. अनेक कंपन्यांमध्ये प्रवासातील आयोजक ते गाईड अशा महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात. काही कंपन्यांमध्ये पस्तीस पर्यटकांमागे एक आयोजक असतो. त्याला एक सहाय्यक आणि गाईड दिला जातो. हे तिघे सहलीची सुरुवात ते शेवट अशी साथ देतात. पैकी मॅनेजर सर्व कामांवर देखरेख ठेवतो आणि गाईड एखाद्या स्थळाची माहिती खुलवून, रंगवून सांगतो.

-Ads-

याचबरोबर परदेशी पर्यटनाचाही विचार केला पाहिजे. या क्षेत्रात तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत. विविध बॅंका परदेशी सहलीसाठी कर्जे देताना दिसतात. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी विविध कोर्सेसचाही आधार घेता येतो. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये टूर मॅनेजमेंट, टूर गाईड, हॉटेल सेवा, वाहतूक सेवा, एअर टिकेटींग अशा प्रकारचे कोर्सेस आखले जात आहेत. त्याचा लाभ तरुण पिढीने घ्यायला हवा. गजबजलेल्या शहरात नागरिक त्रस्त झालेला आढळतो. त्यामुळे अनेक पर्यटक निवांतपणा शोधत असतात. अशी मंडळी पर्यटक कंपन्यांमध्ये हजेरी लावतात. त्यांना जवळच्या एखाद्या देशात जाण्याची इच्छा असते. ही मंडळी छोट्या बजेटच्या सहलीत सामील होताना दिसतात.

त्यामुळे तरुणांनी हे क्षेत्र निवडायला काहीच हरकत नाही. त्यासाठी पर्यटन कोर्स करायला हवा. त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटीविषयीही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात येणाऱ्यांनी परदेशी भाषासुध्दा शिकायला हरकत नाही. भाषा हे पर्यटनातील महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे अशा भाषा आपल्याला यायला हव्यात. पर्यटन कंपनीत फ्रंट ऑफीस, बॅक ऑफीस, टूर मॅनेजर, गाईड असा कर्मचारीवर्ग असतो. अशांनाही हॉस्पिटॅलिटीची गरज असते. हॉस्पिटॅलिटी म्हणजेच सौजन्य. त्याविषयीही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भाषाशैलीतून, देहबोलीतून पर्यटक आकर्षिला जातो. पर्यटन कंपनी चालणाऱ्यांनीही हॉस्पिटॅलिटीविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

– रियाज इनामदार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)