पर्यटन मंत्रालयातर्फे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

नवी दिल्ली, दि. 20 – पर्यटन मंत्रालय विविध उपक्रमांच्या माध्यमातून यंदा तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. यासाठी “योग’ला प्रोत्साहन देणारा 30 सेकंदांचा एक रेडिओ स्पॉट तयार करण्यात आला असून, तो 14 जून पासून 17 एफएम वाहिन्यांवर प्रसारित केला जात आहे. त्याचबरोबर भारताला “योग भूमी’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनकरिता 60 सेकंदांची एक जाहिरात तयार केली आहे. “योग’ला प्रोत्साहन देण्यासाठी 21 जूनपासून दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर महिनाभर एक अभियान राबवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत 15 ते 21 जून दरम्यान पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सोशल नेटवर्क वाहिन्यांवर योगला प्रोत्साहन देणारे अभियान चालविले जात आहे. आयडीवाय 2017 साठी तयार केलेली भित्तीपत्रके आणि फलके भारतीय पर्यटनाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कार्यालयात लावण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2017 मध्ये आयोजित एसएटीटीई आणि जून 2017मध्ये आयोजित योगशाळा एक्‍स्पोमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय योग दिनाला प्राधान्य दिले होते.
पर्यटन मंत्रालयाने 53 आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना आमंत्रित केले आहे, ज्यामध्ये योगला प्रोत्साहन देणारे सहल आयोजक, पत्रकार आणि छायाचित्रकार, योग गुरु आणि योग संदर्भात माहिती असणाऱ्या तज्ञांचा समावेश आहे. 21 जूनला लखनौ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात हा गट सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. यानंतर हा गट देशातील विविध योग संस्था आणि केंद्रांना भेटी देऊन योगसंबंधित माहितीचे संकलन करुन आपापल्या देशात योगाचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत.
योगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पर्यटन मंत्रालय परदेशात स्थित त्याच्या कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. भारतातील पर्यटन कार्यालये, भारतीय पर्यटन आणि यात्रा व्यवस्थापन संस्था देखील आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत. योग दिवस समारंभात सहभागी होण्यासाठी खाजगी क्षेत्र देखील प्रोत्साहन देत असल्याचे पर्यटन मंत्रालयाने कळवले आहे.
पंतप्रधान उद्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौच्या दौऱ्यावर जात आहेत, तिसऱ्या योग दिनानिमित्त लखनौमध्ये रमाबाई आंबेडकर मैदानात आयोजित योग दिन कार्यक्रमात पंतप्रधान उद्या सकाळी सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांचे लखनौमधील सर्व कार्यक्रम आपल्या मोबाईलवर येथे http://nm4.in/anldapp थेट पाहता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)