तुलनेने कमी गुंतवणुकीत होते अधिक रोजगारनिर्मिती 
मुंबई: देशात मध्यमवर्ग वेगाने वाढत आहे. त्याबरोबरच त्यांच्या उत्पन्नात वेगाने वाढ होत आहे. त्याचबरोबर चांगले उत्पन्न असलेल्या तरुणांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे परंगपरागत पर्यटनाबरोबरच साहसी पर्यटन उद्योग वेगाने वाढत असल्याचे स्टर्लिंग हॉलीडेचे मुख्य विपणन अधिकारी पेशवा आचार्य यांनी सांगितले.
ते म्हणाले की, केंद्र सरकार आणि विविध राज्याची सरकारे त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देत आहेत. कारण या उद्योगात कमी गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. याता मुख्य उद्योगाबरोबरच अप्रत्यक्ष उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. भारतात तरुणांची मोठी संख्या पाहता. रोजगार निर्माण करण्याची जास्त आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगींतले. महाराष्ट्र सरकारही रोजगार वाढविणाऱ्या पर्यटन उद्योगावर सातत्याने भर देत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या सर्व बाबी ध्यानात घेऊन आम्ही या क्षेत्रात विस्तार करण्याचे ठरविले आहे. स्टर्लिंग हॉलीडेजच्या 34 ठिकाणी असलेल्या सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. साहसी पर्यटनाची क्षमता पाहून आम्ही नेचर ट्रेल्स रिसोर्टचे अधिग्रहण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चार ठिकाणी साहसी पर्यटनाच्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात खोपोलीतील दरशेत फॉरेस्ट लॉजचा समावेश आहे. या ठिकाणी अनेक साहसी खेळाचे प्रकार उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी कंपनीचे खासगी जंगल विकसित करण्यात आले.
ते म्हणाले की महाराष्ट्रातील कोकणात विविध पर्यटन उद्योग वाढण्यास मोठा वाव आहे. या ठिकाणी निसर्गसौंदर्याबरोबरच अनेक धार्मिक स्थळे आहेत. हा उद्योग कोकणात विकसित झाला तर या भागाचा चेहरामोहरा बदलला जाण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)