पर्यटनामुळे रोजगारात वाढ

नवी दिल्ली – देशातील पर्यटन, प्रवासी वाहतूक क्षेत्रात वाढ होत असून अर्थव्यवस्थेला हातभार लागत आहे. या दोन्ही क्षेत्रांतून 2.59 कोटी रोजगारनिर्मिती करण्यात आलेली असून जीडीपीमध्ये हिस्सा 141.4 अब्ज रुपयांचा आहे. मोबाइल ऍप्लिकेशन, बिग डेटा, एआर, व्हीआर, एआर यामुळे प्रवास क्षेत्राला मदत होत आहे. फिक्की आणि केपीएमजीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात आंतरराष्ट्रीय डिजिटल प्रवास क्षेत्रातील विक्रीमध्ये भारताचा हिस्सा 3.7 टक्‍के असल्याचे सांगण्यात आले.

आशिया पॅसिफिक क्षेत्रात आकाराबाबत भारत तिसरी मोठी बाजारपेठ आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वाढता वापर, तरुणांना पर्यटनाचा आवड यामुळे या क्षेत्राचा विस्तार होत आहे. एका रात्रीच्या निवासासाठी युवकांकडून 6 हजार रुपये खर्च करण्यात येत असून ही रक्कम 55 वर्षे वय असणाऱयांच्या तुलनेत 22 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. डिजिटल क्रांतीमुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळत आहे. अनेक ब्रॅन्ड्‌सकडून तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)