पर्यटनातून विदेशी चलन आवक वाढली

नवी दिल्ली-पर्यटनामध्ये वृद्धी होण्यासाठी गेल्या वर्षात सरकारकडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. यामुळे 2017 मध्ये विदेशी चलनसाठा 20.8 टक्‍क्‍यांनी वाढत 27.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे असे सरकारकडून आर्थिक सर्वेक्षणामध्ये म्हणण्यात आले. आगामी काळातही यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 2017 मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या 1.02 कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये 15.6 टक्‍कयांनी वाढ नोंदविण्यात आली.

2016 मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या 88 लाख होती आणि 22.9 अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन भारताला मिळाले होते, असे संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणातील पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून समजते. केंद्र सरकारकडून पर्यटनाला चालना मिळत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)