पर्यटनवृद्धीसाठीचा निसर्गपूरक पर्याय (भाग-२)

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या ठिकाणी बांधकामे केल्याने नैसर्गिक सौंदर्य आणि समतोल दोन्ही बिघडते. परंतु अशा ठिकाणी पर्यटकांची वर्दळही सध्या वाढली आहे. पर्यटनाला चालना देण्याबरोबरच निसर्गाचेही रक्षण होणे गरजेचे असून, यातून सुवर्णमध्य काढणारे जगातील पहिले “एनर्जी पॉझिटिव्ह’ हॉटेल नॉर्वेमध्ये उभे राहात आहे. आर्क्‍टिक प्रदेशात, हिमनदीच्या सान्निध्यात उभे राहत असलेले हे हॉटेल वस्तुतः एक पॉवर हाउस असेल आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून गरजेपेक्षा अधिक विजेची निर्मिती या हॉटेलची इमारतच करणार आहे.

पर्यटनवृद्धीसाठीचा निसर्गपूरक पर्याय (भाग-१)

एका आकडेवारीनुसार 2015 मध्ये चाळीस लाख पर्यटक नॉर्वेमध्ये आले होते. त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा हा आकडा तब्बल 12 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. आर्क्‍टिक प्रदेशात साहसी सहल आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी नॉर्वेमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर तयार होत असलेले स्वार्ट हॉटेल हे प्रत्यक्षात एक पॉवर हाउसच असेल आणि अपारंपरिक स्रोतांमधून ते वीजनिर्मिती करेल. हॉटेलसाठी लागणारी सामग्री, निर्मिती, संचालन, नूतनीकरण आणि अखेर इमारत नष्ट करेपर्यंतच्या सर्व प्रक्रियांसाठी जी ऊर्जा लागेल, ती येथेच तयार होईल. पॉवरहाउस नॉर्वे हा स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांचा एक समूह आहे. या समूहात स्नोहेटा ही कंपनीही सहभागी आहे. एनर्जी पॉझिटिव्ह हॉटेल स्वार्टच्या स्थापत्यशास्त्राची बाजू हीच कंपनी सांभाळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या हॉटेलच्या डिझाइनची प्रेरणा “फिक्‍सहेझल’ या रचनेतून घेण्यात आली आहे. मच्छीमारांचे मासे वाळविण्यासाठीचे हे एक पारंपरिक लाकडी घरच आहे. वातावरणाचा परिणाम होऊ न शकणाऱ्या लाकडाच्या खांबांपासून हे हॉटेल बांधण्यात येईल. आर्क्‍टिक भागातील पर्यावरणाला कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी लाकडी खांबांमुळे घेतली जाईल.

त्याचप्रमाणे लाकडी बांधकामामुळे या हॉटेलला एक पारदर्शक रूप प्राप्त होईल. माहितगारांच्या म्हणण्यानुसार, आर्क्‍टिक प्रदेशात अशा प्रकारची संरचना उभी करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. अशा प्रकारच्या संरचनेसाठी अशा प्रकारची सामग्री उपयोगात आणणे आवश्‍यक आहे, जी हवा, पाऊस, थंडी आणि बर्फापासून सुरक्षितता प्रदान करण्यास उपयुक्त असेल. एखादा आर्किटेक्‍ट, उद्योजक किंवा विकसक एकट्याच्या जिवावर अशा प्रकारची संरचना उभी करू शकणार नाही. ज्ञान आणि अनुभव याचा बेजोड मिलाफ त्यासाठी करणे आवश्‍यक आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन एक सक्षम समूह तयार करणे आवश्‍यक असून, प्रत्येकाच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा जास्तीत जास्त लाभ घेतला, तरच अशी इमारत बांधणे शक्‍य होणार आहे. म्हणजेच हे एक टीमवर्क असून, त्यासाठी स्नोहेटा कंपनी आणि संपूर्ण समूह एकत्र येऊन काम करीत आहे.

आकाशातून पाहिल्यास हे हॉटेल एखाद्या गोल आरशासारखे भासेल. हॉटेलच्या कोणत्याही भागातून निसर्गाचे दृश्‍य धूसर दिसणार नाही. हॉटेलचे वर्तृळाकृती डिझाइन अशा प्रकारे तयार केले आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणाहून निसर्गाचा चमत्कार अत्यंत सुस्पष्ट दिसू शकेल. इमारतीतील रेस्टॉरंट असो, रहिवासाच्या खोल्या असोत वा छत असो, प्रत्येक ठिकाणी थेट सूर्यकिरण पोहोचतील आणि त्याद्वारे जास्तीत जास्त ऊर्जानिर्मिती करता येईल. हॉटेलचे बांधकाम याच वर्षी सुरू होण्याची आशा प्रकल्पातील व्यक्तींना असून, 2021 पर्यंत हे अवघड बांधकाम पूर्ण झालेले असेल. बोडो शहरापासून या हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना “एनर्जी न्यूट्रल’ म्हणजेच ऊर्जेचा वापर न करणाऱ्या बोटींमधून यावे लागेल. हॉटेलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पर्यटनाला तर चालना मिळेलच; परंतु निसर्गाच्या सौंदर्याला कोणतेही गालबोट लागू नये, याची दक्षताही घेतली जाईल.

– अमोल पवार, कॅलिफोर्निया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)