पर्यटनवृद्धीसाठीचा निसर्गपूरक पर्याय (भाग-१)

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या ठिकाणी बांधकामे केल्याने नैसर्गिक सौंदर्य आणि समतोल दोन्ही बिघडते. परंतु अशा ठिकाणी पर्यटकांची वर्दळही सध्या वाढली आहे. पर्यटनाला चालना देण्याबरोबरच निसर्गाचेही रक्षण होणे गरजेचे असून, यातून सुवर्णमध्य काढणारे जगातील पहिले “एनर्जी पॉझिटिव्ह’ हॉटेल नॉर्वेमध्ये उभे राहात आहे. आर्क्‍टिक प्रदेशात, हिमनदीच्या सान्निध्यात उभे राहत असलेले हे हॉटेल वस्तुतः एक पॉवर हाउस असेल आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून गरजेपेक्षा अधिक विजेची निर्मिती या हॉटेलची इमारतच करणार आहे.

ज्या प्रमाणात सुबत्ता वाढत आहे, त्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय वाढताना दिसून येतो. जेव्हा लोकांची आर्थिक क्षमता वाढते, तेव्हा ते पर्यटनाचा विचार करतात. पूर्वी जवळपास पर्यटनासाठी जाणारे आज परदेशात फिरून येतात. पर्यटन उद्योगातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे हॉटेल व्यवसाय होय. प्रवासाचा शिणवटा कमी होईल, अशी आरामदायी हॉटेल उभारण्याचा प्रयत्न जगभरातील वास्तुविशारद करीत आहेत. शांतता आणि आरामदायी निवासाबरोबरच पर्यटकांच्या मनोरंजनाची सुविधा हॉटेल्स पुरवतात. निसर्गाच्या सान्निध्यात, शांत वातावरणात हॉटेल बांधली जातात आणि स्थानिक लोककलांचा परिचय पर्यटकांना हॉटेलच्या आवारातच करून दिला जातो. टप्प्याटप्प्याने बदलत जाणारा हा हॉटेल व्यवसायाचा प्रवास आता एका अनोख्या वळणावर आला आहे. जगातील पहिले “एनर्जी पॉझिटिव्ह’ हॉटेल नॉर्वेमध्ये उभारण्यात येत आहे. आर्किटेक्‍ट अॅडव्हेन्चर ऑफ नॉर्वे आणि “स्नोहेटा’ या आंतरराष्ट्रीय डिझाइन अँड आर्किटेक्‍चरल कंपनीतर्फे या हॉटेलची निर्मिती होत असून, आर्क्‍टिक क्षेत्रात पर्यटन व्यवसायास गती देण्याचा उद्देश यामागे आहे. “स्वार्ट’ असे नाव या हॉटेलला देण्यात आले असून,

नॉर्वेजियन भाषेत त्याचा अर्थ “काळा’ असा आहे. स्वार्टसन हिमनदीच्या निळ्या पाण्याला वंदन म्हणून हॉटेलचे नाव असे ठेवण्यात आले आहे. पर्यावरणातील बदलांचे प्रभाव कमी करण्यासाठी “व्ही’ आकाराच्या ब्लॉकवर या हॉटेलचे बांधकाम केले जाणार आहे. या हॉटेलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही आधुनिक हॉटेलच्या तुलनेत 85 टक्के कमी ऊर्जेचा वापर येथे केला जाणार आहे. हे कसे शक्‍य होणार? या प्रश्‍नाचे उत्तर म्हणजे हे हॉटेल स्वतःच ऊर्जेची निर्मिती करणार आहे. हॉटेलपासून हिमनदीपर्यंत 360 अंशातील नयनमनोहर दृश्‍य पाहण्याचा आनंद या हॉटेलमधून घेता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यटनवृद्धीसाठीचा निसर्गपूरक पर्याय (भाग-२)

ध्रुवीय प्रदेशावरील बर्फ वेगाने वितळत चालले आहे. तेथील हिमनदीचा नजारा पाहण्याची ओढ अनेक पर्यटकांना असते. अशा पर्यटकांना या बर्फाळ प्रदेशातील नजारा पाहायला मिळावा आणि अधिक वीजवापरामुळे पर्यावरणाची याहून अधिक हानी होऊ नये, हा या हॉटेलच्या निर्मितीमागील उद्देश आहे. या हॉटेलमध्ये 2021 पासून पाहुणे राहायला येऊ शकतील, असे अपेक्षित आहे. जागतिक तापमानवाढीमुळे ज्या प्रमाणात जगभरात उकाडा वाढत आहे, तेवढेच थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढत आहे.

– अमोल पवार, कॅलिफोर्निया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)