पर्यटननगरी नागरिकांनी सजली

दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

लोणावळा – दिवाळी संपली असली तरीही शाळांना खासगी आणि सरकारी कार्यालये तसेच कंपन्यांना मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळा शहरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. शुक्रवारपासूनच लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली होती. मात्र रविवारी ही संख्या वाढलेली होती.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत तसेच मित्र मंडळीसोबत काही वेळ एकत्र घालविण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची प्रथम पसंती हे नेहमीच एखाद्या थंड हवेच्या पर्यटन स्थळाला असते. आणि त्यातही मुंबई पुण्यासह गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांची पसंती ही नेहमीच लोणावळा शहराला राहिली आहे. यंदाही पर्यटकांनी लोणावळ्याला पसंती दिल्याने मागील काही दिवसांपासून शहरात पर्यटकांची आणि पर्यायाने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. एक्‍सप्रेस वेवर ही वाहनांची संख्या वाढलेली दिसून येते आहे.

पावसाळा ऋतू सरला असल्याने येथील धबधबे आणि धरणातील पाणी कमी झाले असल्याने पर्यटक येथील राजमाची पॉईंट, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणांना पसंती देताना दिसून येत आहे. शहरातील बहुतेक सर्व हॉटेल्स फुल्ल झाली असून, खासगी बंगले देखील पर्यटकांनी फुलले आहेत. ही गर्दी अजून पुढील एक आठवडा कायम राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)