पर्यटकांना ‘आडवाटेवरच कोल्हापूर’चे मोफत दर्शन…

१३ एप्रिल पासून दोन बसेस धावणार

कोल्हापूर –  कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटन स्थळे व त्यांचा इतिहास लोकासमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरच कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. १३ एप्रिल पासून शुक्रवार व शनिवारी दोन-दोन बसेस सुटणार असून यामध्ये ५० टक्के स्थाथिक पर्यटकांना तर उर्वरित बाहेरील पर्यटकांना राखीव राहील असेही त्यांनी सांगितले.

हिल रायडर्स फौंडेशन, एक्टीव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सहलीचे आयोजन केले असून,यासाठी  हॉटेल मालक संघ, विविध संघटना, बचत गटांचे सहकार्य लाभल्याचे सांगत पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड म्हणाले, कोल्हापूरात पर्यटक आला की जोतिबा, अंबाबाई, नृसिंहवाडी येथे पर्यंत मर्यादीत राहतो. पण कोल्हापूरच्या दुर्गम डोंगरात अनेक   छुपी  पर्यटनस्थळे  आहेत. प्राचीन गुहा, गड, शिल्पे, युध्दभूमी, मंदीरे, जंगले यांचे दर्शन पर्यटकांना व्हावे, पर्यटनस्थळे सक्षम होतीलच पण तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी ही संकल्पना पुढे आणली. कोल्हापूर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिग्लज तालुक्यातील बारा हून अधिक प्रेक्षणीय स्थळे दाखवली जाणार आहे.

दोन्ही बसमध्ये तीन मुले व तीन मुली गाईड म्हणून राहणार आहे.निसर्ग मित्र अनिल चौगुले म्हणाले, सहलीचा मार्ग निसर्गरम्य आहे. शिवडाव येथील देवराई व तेथील लोकांचे नाते वेगळे आहे. येथे पंचमहाभुतांचा अनुभव येतो, इतका सुंदर परिसर आहे. अशी अनेक ठिकाणे आपण या माध्यमातून पाहू शकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
17 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)