पर्यटकांच्या सुरक्षेच्या हमीनंतर वेण्णा लेकमध्ये बोटींग सुरू

पोलिसांच्या बडग्यानंतर महाबळेश्‍वर पालिकेला जाग
महाबळेश्‍वर, दि. 28 (प्रतिनिधी) – महाबळेश्वर, ता. पोलिस उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर अखेर पर्यटकांच्या सुरक्षिततेची हमी दिल्यानंतर महाबळेश्वर नगरपालिकेचे वेण्णा धरणावरील बोट क्‍लब सुरु करण्यात आली. महाबळेश्वर नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरपालिकेला बोट क्‍लब बंद ठेवण्याची नामुष्की आल्याने शहरात उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिका येथील वेण्णा लेक धरणावर उत्पन्नासाठी बोट क्‍लब चालवते. या बोट क्‍लबच्या माध्यमातून नगरपालिकेला चांगले उत्पन्न मिळत असते. या बोट क्‍लबच्या बोटींची देखभाल व दुरुस्ती व वेण्णालेक बोट क्‍लब येथील जेट्टीची देखभाल ही मॅप्रो या स्थानिक कंपनीकडे देण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात येथील बोटींच्या दुरुस्तीबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे अहवाल देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांनी या परिसराचे पूर्ण चित्रीकरण करुन नगरपालिकेला बोट क्‍लब बंद करण्याचे निर्देश दिले होते. बोट क्‍लब बंद करण्याच्या काढलेल्या आदेशाने पालिकेला खडबडून जाग आली. पी.एस.आय बालाजी गायकवाड यांनी पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली होती. बोट क्‍लब बंद झाल्याने पालिकेचे कर्मचारी व नगरसेवकांनी त्वरीत पोलिस स्टेशन येथे धाव घेतली. यावेळी पोलिस निरिक्षक नाळे यांनी वाई येथे उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्याकडे त्यांना परवानगीसाठी पाठवले. वाई येथील उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करुन व्यवसाय करावा अशा सूचना केल्या व याबाबत पालिकेकडून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे लेखी जबाबदारी घेऊन त्यांना बोट क्‍लब सुरू करण्याची परवानगी दिली. या संपुर्ण प्रक्रियेचे पुर्तता करुन आज अखेर पर्यटकांना सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेटसह बोटींग करण्यासाठी बोट क्‍लब सुरु कण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)