पर्यंतीच्या सरपंचपदी जयश्री बाड

पर्यंती : जयश्री बाड यांचा सत्कार करताना सुभाष नरळे, समवेत इतर.

म्हसवड, दि. (प्रतिनिधी) – माण तालुक्‍यातील पर्यंती गावच्या सरपंच पदी सौ. जयश्री न्यानदेव बाड यांची बिनविरोध निवड झाली. गत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या नेतृत्वाखाली पर्यंती ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलची सत्ता स्थापन झाली आहे. सरपंच सौ. योगिनी सुभाष नरळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात या पदासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ. जयश्री न्यानदेव बाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीबद्दल त्यांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, जि. प. सदस्या सौ. भारती संदिप पोळ, सौ सोनाली मनोज पोळ, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील, म्हसवडचे माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, प्रा. कविताताई म्हेत्रे, पृथ्वीराज राजेमाने, प्रदिप आटपाडकर, वसंत काळे आदीसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)