पर्थच्या खेळपट्टीला साधारण म्हणणे अर्थहीन – सचिन

नवी दिल्ली: आयसीसीने पर्थच्या खेळपट्टीचे अवलोकन ‘साधारण’ असे केल्यावर अनेक स्तरातून या वर टीका होत आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील याबाबत आपले मत दिले आणि आयसीसीवर ताशेरे ओढताना पर्थच्या खेळपट्टीला साधारण म्हणणे अर्थहीन असून अशा खेळपट्टीमुळेच कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळू शकते असे म्हटले आहे. पर्थ कसोटी सामन्याचे सामनाधिकारी रंजन मडगुळे यांनी खेळपट्टीचे अवलोकन करून आयसीसीकडे पाठवले होते.

सचिन पुढे म्हणाला, कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टी खूप मोठी भूमिका बजावत असते. जर तुम्हाला कसोटी क्रिकेटला संजीवनी द्यायची असेल आणि सामने रोमांचक बनवायचे असतील तर अश्‍याच प्रकारच्या खेळपट्टी बनवाव्या लागतील जेथे खर्या अर्थाने फलंदाजांच्या कौश्‍यल्याची कसोटी लागते, असेही सचिन म्हणाला. तर शेन वॉर्न, मिचेल जॉन्सन आणि मायकल वान या अन्य काही महान खेळाडूंनी देखील आयसीसीवर टीका केली होती.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)