पर्थची खेळपट्टी पाहुन आनंदी – विराट कोहली

file photo

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज पासून दुसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. याचदरम्यान विराट कोहलीने पर्थच्या मैदानावरील खेळपट्टी पाहून निराश होण्यापेक्षा जास्त आनंदी आहे, असे सांगितले असून सामन्यापुर्वी खेळपट्टीवरील गवत न हटण्याची आशा व्यक्त केली आहे.

एका क्रीडा वेबसाईटला दिलेल्या मुलखतीमध्ये विराट म्हणाला की, मैदानावरील गवत संघाच्या जलदगती गोलंदाजांसाठी फायद्याचे आहे. मी त्या खेळपट्टीची पाहणी केली. ऍडलेड येथिल खेळपट्टीच्या तुलनेत पर्थच्या खेळपट्टीवर अधिक गवत असल्याने ते दोन्ही संघांसाठी फायद्याचे आहे. विजयाचे ध्येय नजरेसमोर ठेवुनच आम्ही मैदानात उतराणार आहोत. त्यातच आमच्या संघात सध्याच्या घडीतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असल्या कारणाने ऑस्ट्रेलिया पेक्षा जास्त फायदा हा भारतीय संघाला होईल अशी आपेक्षा आहे. असेही त्याने यावेळी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना कोहलीने संघातील गोलंदाजांनी आपली भुमीका लक्षात घेत गोलंदाजी करतील अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली असून तो म्हणाला की, जर गोलंदाज स्वतःची भुमिका नीट बजावु शकत नसतील तर अधिक धावसंख्या काढणे फायद्याचे नाही. सामन्याच्या दोन्ही सत्रामध्ये वीस पैकी वीस बळी घेणे गरजेचे आहे. तेंव्हाच विजय मिळू शकतो असेही त्याने नमूद केले. कोणत्याही कसोटी सामन्यात विजय मिळवणे शक्‍य आहे, पण त्यासाठी वीस बळी घेतले पाहिजेत. सामन्यात तुम्ही किती धावा काढता हे गरजेचे नाही. गोलंदाजांचे प्रदर्शन चांगले हवे. मी खुष आहे कारण माझ्या संघात चांगले गोलंदाज आहेत जे वीस बळी घेण्यासाठी सक्षम आहेत. आणि या सामन्यात नक्‍कीच त्याचा फायदा संघातील गोलंदाज घेतील अशी अपेक्षाही त्याने यावेली व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)