परोपराकरातच खरे जीवन – घुले महाराज

पिंपरी – जो परोपकारासाठी जगतो, तोच खरे जीवन जगतो, असे प्रतिपादन ह.भ.प.पांडूरंग महाराज घुले यांनी भोसरी येथे केले.

जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त घुले महाराज यांना जुन्नर भूषण तर आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विकासरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना घुले महाराज बोलत होते. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शिवाजीराव आढळराव होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती विशाल तांबे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका अनुराधा गोफणे, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, अशोक खांडेभराड व्यासपीठावर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घुले महाराज म्हणाले की, मी चाकण येथे राहत होतो त्यावेळी माधुकरी मागून मी दिवस काढले. आजच्या पिढीला हा त्रास होवू नये यासाठी जुन्नर तालुका मित्र मंडळाकडून विद्यार्थी वसतीगृहाची मागणी होत आहे. ही मागणी पुर्ण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर आमदार शरद सोनवणे म्हणाले की, राजकारणात संयम महत्त्वाचा आहे. तर राजकारण आणि पदापेक्षा आपल्या मागे उभा राहणारा समाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा पुरस्कार आपल्यामागे उभा राहणाऱ्या समाजाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार आढळराव पाटील म्हणाले की, नाशिकफाटा ते राजगुरुनगर या 38 किलोमीटर रस्त्यापैकी 15 किलोमीटरचा रस्ता सरकारच्या ताब्यात आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या हद्दीत रस्ता रुंदीकरणात फेरबदल केल्याने हे काम धिम्या गतीने सुरु होते. मात्र, आपला सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. नारायणगाव बाह्य वळण रस्ता, खेड घाटासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत 68 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित खर्गे व संपर्क प्रमुख उल्हास पानसरे, सचिव संतोष काशिद, उपाध्यक्ष कैलास आवटे, सुहास गटकळ, खजिनदार मिननाथ सोनवणे, अण्णा मटाले, योगेश आमले, एस. आर. शिंदे, नवनाथ नलावडे, सुहास वाघ, दीपक सोनवणे, अमोल बांगर, इंद्रजित पाटोळे, ऍड. महेश गोसावी, श्‍वेता पाटे, स्वप्निल पोखरकर यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)