परीक्षेवर बहिष्कार टाकत विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी आजही घेतला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांशी उपोषणस्थळी न भेटता अन्य ठिकाणी चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवू, अशी भूमिका कुलगुरूंनी घेतली आहे. यावरून विद्यार्थ्यांचा वाद चिघळला आहे.

विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शेवटची सत्र परीक्षा वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून सुरू झाली. या परीक्षेला विद्यार्थी बसतील, अशी अपेक्षा होती. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी स्वत: कुलगुरू आणि विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि त्यांच्या परीक्षेसंबंधी सर्व मागण्या मान्य करून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, त्याला या विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

विभागाच्या दुसऱ्या वर्षातील 32 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला, तर 8 ते 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; तर अन्य गैरहजर होते. विभागातील विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करीत आहेत. त्याची प्रमुख मागणी इंग्रजी विभागप्रमुखांना हटवण्याची आहे. ही वगळता अन्य सर्व मागण्या विद्यापीठाने मान्य केल्या आहेत. असे असून देखील विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत. त्यापूर्वी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे, डॉ. प्रफुल्ल पवार आणि इतर अधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करून कुलगुरूंना भेटून प्रश्‍न मांडण्याबाबत आवाहन केले. त्यावर विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना भेटले.

या चर्चेत कुलगुरूंनी परीक्षेसंबंधीच्या सर्व मागण्या त्वरित सोडवण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, विद्यार्थी प्रतिनिधीनी इंग्रजी विभागाच्या प्रमुखांना हटवण्याच्या मागणीवर अडून राहिले. या मागणीबाबत कुलगुरूंनी सांगितले, विभागप्रमुखांना हटवण्याबाबत विद्यापीठाच्या योग्य त्या प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन दिले. तरी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)