परीक्षा शुल्काची वसुली सुरूच

पुणे – राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य शासनाकडून मोठ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने महाविद्यालय स्तरावरील उच्च व तंत्र शिक्षण परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र सध्या दहावी- बारावीचे परीक्षा शुल्क भरले जात असून, शालेय स्तरावर परीक्षा शुल्क माफ करण्याचा कोणताच आदेश आले नसल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यात दृष्काळसदृश्‍य परिस्थिती असतानाही शालेय शिक्षण विभागाला दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करीत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर येत आहे. त्यावरून शिक्षण विभागांवर मोठी टीका होत आहे.

राज्य शासनाने दि. 31 ऑक्‍टोबर रोजी 151 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. त्यानंतर दि. 6 नोव्हेंबर रोजी एकूण 268 तालुक्‍यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये करण्यात आला. तसेच या तालुक्‍यांमध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीसाठी अन्य सवलतीही लागू करण्यात याव्यात, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व परीक्षांचे शुल्क माफ करण्याचे शासन निर्णय काही दिवसांत जारी केले. शालेय शिक्षण विभागाकडूनही अशाप्रकारचा शासन निर्णय काढणे अपेक्षित होते. मात्र, दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाला एक महिना उलटला तरी अद्याप शासन निर्णय निघालेला नाही.

-Ads-

राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जात आहेत. दुष्काळ जाहीर होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 30 नोव्हेंबर रोजी संपली आहे तर, दहावीसाठी दि. 10 डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर अतिविलंब शुल्क आकारून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दहावी व बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह दि. 5 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागत आहे. शासन निर्णयाप्रमाणे मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शासन निर्णयानंतरही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली सुरूच राहणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाला कधी जाग येणार, असा सवाल विद्यार्थ्यांतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)