परीक्षा मूल्यमापनात चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई

 

पुणे, दि.30 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापनात चुकीचे काम केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा पाच जणांवर परीक्षा विभागाने कारवाई केली आहे. यापुढे परीक्षेचे कोणतेही काम करण्यास बंदी घालण्यात आली असून, त्यांचे मानधन परत घेतले जाणार आहे, अशी कारवाई करण्याचे आलेले परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

आबेदा इनामदार महाविद्यालयाचे मॉडिटर, कस्तुरी शिक्षण संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य, बाबुराव कुल कॉलेजचे कनिष्ठ पर्यवेक्षक, नाशिकच्या एआयटीएस महाविद्यालयाचे कनिष्ठ पर्यवेक्षक आणि वरिष्ठ पर्यवेक्षकांचा यात समावेश आहे. अनुक्रमे उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना पहिल्या पानावर गुणांमध्ये खाडाखोड केली. परंतु, आतील पानावर मार्कामध्ये बदल केलेला नाही. त्यांना 2018 पासून पुढील दोन वर्षांसाठी परीक्षेचे कोणतेही काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

एमबीए अभ्यासक्रम पेपरच्या उत्तरपत्रिका केंद्रीय मूल्यमापन प्रकल्पाच्या ठिकाणी वेळेत जमा न करणे, उत्तरपत्रिका केंद्रीय मूल्यामापन प्रकल्पात येण्यापूर्वीच पेपर तपासणे, उत्तरपत्रिकेच्या सेक्‍शन दोनला बारकोड न लावणे अशा चुका पर्यवेक्षकांनी केल्या आहेत. त्यांचे मानधन परत घेण्यात येणार आहे. अशा पर्यवेक्षकांवर परीक्षा समितीच्या निर्णयानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अशोक चव्हाण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)