परीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू

पहिलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या आठवणी सर्वांसाठीच खास असतात. याला बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. पिंक, मनमर्जियॉं, मुल्क यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री तापसी पन्नूने एका कार्यक्रमात तिच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या. नववीत असताना पहिल्यांदा प्रेमात पडल्याचे तापसीने सांगितले.

तापसी म्हणाली, मी नववीमध्ये असताना पहिल्यांदा रिलेशनशीपमध्ये अडकले. माझ्या मित्र-मैत्रिणींच्या तुलनेत मला काहीसा उशीरच झाला होता. माझं अफेअर खरंच मजेशीर होते. दहावीच्या बोर्ड परीक्षा येत आहेत, मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायंच आहे, असं सांगून तो मला सोडून गेला, असे तापसीने सांगितले. मला अजूनही आठवतं. त्याकाळी आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते. मी माझ्या घरामागे असलेल्या पीसीओवरून त्याला फोन करायचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझी सूर्यरास सिंह असून जन्म एक ऑगस्टचा. एक आणि सिंह (लिओ) हे भयंकर कॉम्बिनेशन आहे. कामात आणि वैयक्तिक आयुष्यात मला सेंटर ऑफ अटेंशन व्हायला आवडतं. जर माझा पार्टनर सहज नियंत्रणात येत असेल, तर मला मजा येत नाही. त्यात काय एक्‍साईटमेंट! मला जोडीदार असा हवा, ज्याच्याकडे मी आदराने पाहावे, असे तापसी सांगते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)