परिस्थिती हाताबाहेर जाईल – अब्दुल्ला यांचाही इशारा

श्रीनगर – कलम 35अ रद्द झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनीही दिला आहे. केंद्र सरकारला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते कलम अबाधित राखण्यासाठी मी मरेपर्यंत लढेन. अर्थात, त्या कलमाला कुणी धक्का लावणार नाही.

याआधी दोनवेळा घटनापीठाने तसे स्पष्ट केले आहे, याकडेही अब्दुल्ला यांनी लक्ष वेधले. दरम्यान, पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजवटीत त्या देशाचे आणि भारताचे संबंध सुधारतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानने दहशतवाद सोडल्यास केवळ भारतच नव्हे; तर संपूर्ण जग त्या देशाला सहकार्य करेल, असे महत्वपूर्ण वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)